उमरगा (प्रतिनिधी)- दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी जि.प.प्रशाला, उमरगा येथे शहरातील सर्व शाळेचे प्राथमिक शिक्षक व रोटरी क्लब उमरगा त्यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदयरोग दिनाच्या निमित्त साधून शिक्षकांना हृदयरोगासंबंधीची घ्यावयाची काळजी यासाठी शहरातील प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉक्टर शैलेश मठपती यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली व प्रात्यक्षिक देखील करून दाखवले. 

शिक्षक ,पालक व विद्यार्थी याची त्रीसुत्रातुन शिक्षकाचे मनोबल चांगले राहिले तर तो विद्यार्थ्यांना चांगल्या रीतीने घडवू शकतो.आज व्यस्त जीवनशैली मुळे प्रत्येक माणूस आपल्या व्यवसायात दडपणाखाली काम करत आहे. असे जरी असले तरी आपली दिनचर्या जर आपण हलकासा व्यायाम ,आहारावर नियंत्रण व झोपीचे प्रमाण सुरळीत ठेवले तर पुढे उद्भवणारे रोग हे निश्चितपणे आपण टाळू शकतो यासंबंधीचे मार्गदर्शन डॉक्टर मठपती सरांनी केले.या कार्यक्रमासाठी शहरातील एकूण शंभर  शिक्षक उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर धनंजय मेनकुदळे ,सचिव राजु जोशी उपस्थित होते .प्रात्यक्षिक करत असताना डॉक्टर मठपती सरांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याच्यावर कसा इलाज करता येतो हे प्रात्यक्षिक अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने  सर्वांना  करून दाखवले त्यामुळे शाळेत, घरातील वृद्धव्यक्ती ,किंवा रस्त्यावर असा प्रसंग जर उद्भवला तर आपण एखाद्याचे प्राण वाचू शकतो हा विश्वास सर्वांमध्ये आला असे उद्गगार.शिक्षकांनी काढले . कार्यक्रमाचे संयोजक पदमाकर मोरे सर यांनी रोटरी क्लब व डॉक्टर शैलेश मठपतींचे आभार मानले.

 
Top