तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवात यंदा नैसर्गिक संकटाचा मोठा फटका शेतकऱ्यांबरोबरच नवराञोत्सवात देवीदर्शनार्थ येणाऱ्या भाविकांना बसत आहे. या पावसामुळे तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील व्यापारीसह अन्य वर्गाचे व्यवसाय कमी होवुन त्यांना ही आर्थिक फटका बसत आहे. तिर्थक्षेञ तुळजापूरला तीन दिवस झालेल्या पावसामुळे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले.
घटस्थापनेच्या पुर्वसंध्येला चालु झालेला पाऊस गेली तीन दिवस दमदार बरसात आहे. देविदर्शनार्थ भाविकांची तुफान गर्दी प्रतिवर्षी उसळत असे. या वर्षी तब्बल 30 ते 40 टक्क्यांनी घटली. यंदा तर पुणे, सोलापूर रस्त्यावर असणाऱ्या लांबोटी पुलानजीक पाणी आल्याने मंगळवार हा मार्ग बंद झाल्याने पुणे, मुंबई हुन येणारे भाविक लांबोटीला अडकुन पडले. त्यांना तुळजापूर ऐवजी लांबोटीला. मुक्काम करावा लागला. आजपर्यतचा इतिहासात हे प्रथमच घडले आहे. नवराञोत्सव अक्षरशा भिजत देविदर्शन घ्यावे लागत आहे. पाऊस मुसळधार पडत असल्याने याञा नियोजन हि विस्कळीत होत आहे. श्रीतुळजाभवानी मातेची शारदीय नवराञोत्सवातील सलग पहिले तीन दिवस भाविकांची प्रचंड गर्दी असते. याच कालावधीत पाऊस पडत असल्याने भाविकांचे प्रचंड हाल झाले.
नवरात्रोत्सवात प्रामुख्याने शेतकरी व कष्टकरी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होतो. मात्र यावर्षीच्या मुसळधार पावसामुळे त्यांच्या शेती, घरदारे आणि जनावरांचे मोठे नुकसान झाले. शेतीतून उत्पन्न न मिळाल्याने अनेकांनी तुळजापूरच्या वारीस यावेळी मुक्काम न करता घरीच राहणे पसंत केले. आई आम्हाला नैसर्गिक संकटातुन सुटका कर परत येवुन वारी करु असे साकडे तेथुनच बसुन घातले. पावसाचा थैमान पार्श्वभूमीवर शहरीभागातील येणाऱ्या भावीकांनी देविदर्शनार्थ येणे टाळत आहेत.