तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव येथे होणाऱ्या दिनांक 29 सप्टेंबर 2025 वार सोमवार रोजी बंजारा समाजाच्या आरक्षणासाठीच्या महामोर्चा साठी तांडा, वाडी, वस्तीत जाऊन जनजागृती करून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य तथा माजी सभापती प्रकाश चव्हाण, हरिष जाधव, शिवाजी राठोड, लक्ष्मण राठोड ,राजू चव्हाण, सुरेश राठोड,रवि महाराज आदि बंजारा बांधवांनी तालुक्यातील जखंणी तांडा, येडोळा तांडा, राम नगर तांडा, रामतीर्थ तांडा, हंगरगा नळ तांडा, लोहगाव तांडा, नंदगाव तांडा, अणदूर वत्सला नगर तांडा,फुलवाडी तांडा, धनगर वाडी तांडा,सराटी तांडा,केशेगाव तांडा,इटकळ तांडा, घोडके तांडा, पुजारी तांडा, पाटील तांडा , नरखोरी तांडा,गंधोरा,किलज तांडा,कामठा,दिपक नगर ,आदि ठिकाणी जाऊन महामोर्चात येण्यासाठी आवाहन केले आहे.