तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी पाळीकर पुजारी मंडळास श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानने मावेजा देण्याची मागणी श्रीतुळजाभवानी पाळीकर पुजारी मंडळाने श्रीतुळजाभवानी  मंदीर संस्थानकडे निवेदन देवुन केली आहे.

निवेदनात म्हटलं   आहेकि तुळजाभवानी पुजारी मंडळ तुळजापूर ही नोंदणीकृत संस्था असुन 1909 च्या मुळ यादी प्रमाणे 284 हे तुळजाभवानी मंदिर संस्थानाचे हक्कदार असुन या सर्वाना मावेजा मिळावा. सन 1328 फसली सन 1909 च्या निजाम गॅझेट नुसार पाळीकर भोपे हेच श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे मुळ हक्कदार आहेत. या सर्व बाबीचे आवलोकन करुन आम्हाला वरील सर्व विषयात आमची बाजु मांडण्याची संधी मिळावी. यापुर्वी मंदिर संस्थान मार्फत भेदभाव व दुजाभावाची वागणुक मिळाल्यामुळे आम्हा हक्कदार वंशजांना मावेजापासुन वंचित राहावे लागले आहे. यापुढे श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या पुजारी बांधवांनाही मावेजा बाबत प्रत्येक बैठकीत विश्वासात घेवुन व चर्चा करुन या संबंधी सर्व पत्र व्यवहार करताना आम्हास विश्वासात घेवुनच निर्णय घेण्यात यावेत. अशी मंदीर संस्थानला दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे.

 
Top