धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग उस्मानाबाद येथील औषधनिर्माणशास्त्र () विभागाने दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी जागतिक औषधनिर्माणशास्त्र दिन विविध उपक्रम घेऊन साजरा केला.  या दिवसाची सुरवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. धन्वंतरी प्रतिमा पूजन करून झाली. यावेळी विशेष अतिथी म्हणून तेरणा ट्रस्टचे विश्वस्त श्री. बाळासाहेब वाघ, तेरणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.बी. मोरे, प्रमुख दासलॅब, पुणे आणि अभय आयुर्वेदिक औषधालयचे प्रॉडक्शन  हेड श्री. राम लगदिवे, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. विक्रमसिंह माने सरांनी यंदाच महाविद्यालयाच्या सिम्बॉयसिस कॉलेज सोबत झालेल्या कराराबद्दल सविस्तर माहिती दिली. या करारानुसार फार्मसी च्या विद्यार्थ्यांमध्ये पायथोन व आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखे सॉफ्टवेअर स्किल  डेव्हलपमेंट करून फार्मसी चे विद्यार्थ्यांना विविध इंटरशिप व प्लेसमेंट मिळण्यासाठी प्रयत्नशील आहोत  असा विश्वासही व्यक्त केला. प्रमुख अतिथीनिदेखील फार्मसी विभागात असलेल्या अनेक अपॉर्च्युनिटीची माहिती दिली. तेरणा ट्रस्टचे विश्वस्त श्री  बाळासाहेब वाघ सरांनी देखील विद्यार्थ्यांना नियमितता व शिस्तीचे महत्व समजावून सांगितले. त्यानंतर महाविद्यालयातर्फे फार्मसी विभागात पोस्टर प्रेसेंटेशन  चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी फार्मसी क्षेत्राच्या विविध विषयातील नवीन उपक्रम सादर केले. त्याचप्रमाणे महाविद्यालयात मॉडेल मेकिंग कॉम्पिटिशन हे देखील आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी शरीरातील अनेक अवयव आणि त्यावर काम करणाऱ्या विविध औषधी यांची थ्रीडी मधील मॉडेल्स प्रदर्शित केले. त्याचप्रमाणे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमधील वापरण्यात येणाऱ्या मशीनचे देखील नाविन्यपूर्व मॉडेल्स बनवले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि कला यांचा अतिशय सुंदर संयोग केला होता.  महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली आणि नेमणूक केलेल्या जजेसनी देखील विद्यार्थ्यांचे कौतुक केले. निवडण्यात आलेल्या प्रथम, द्वितीय, आणि तृतीय क्रमांकाचे विद्यार्थ्यांना पारितोषिके देखील देण्यात आली. 

फार्मासिस्ट दिन 2025 निमित्त टी.पी.सी.टी. कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे ऑनलाईन स्पर्धांचे यशस्वी आयोजन फार्मासिस्ट दिन 2025 च्या निमित्ताने टी.पी.सी.टी.च्या कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे ऑनलाईन रील मेकिंग स्पर्धा व ऑनलाईन पोस्टर सादरीकरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांना राज्यभरातील आणि बाहेरील विविध महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

ऑनलाईन पोस्टर सादरीकरण स्पर्धा: बी. फार्मसी विभागातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत प्रभावी सादरीकरण करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक  पूजा लोमटे (आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसी, धाराशिव), द्वितीय क्रमांक  विकास डेडे (के. टी. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, धाराशिव),तृतीय क्रमांक  बादल गुप्ता (डीआयटी युनिव्हर्सिटी, देहराडून - इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) या विजेत्यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले. सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

ऑनलाईन पोस्टर सादरीकरण स्पर्धा: डी. फार्मसी विभागातील विद्यार्थ्यांनीही या स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला. प्रथम क्रमांक  पद्मास अश्विनी रमेश्वर (शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, आलमळा), द्वितीय क्रमांक  हेमा वाघारे (रवींद्र विद्या प्रसारक मंडळ, नाशिक), या विद्यार्थिनींनी आपले कौशल्य प्रभावीपणे सादर करत विजेतेपद मिळवले. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

ऑनलाईन रील मेकिंग स्पर्धा-डी. फार्मसी विभागातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्साही सहभाग नोंदवत आपली सर्जनशीलता दर्शवली.   प्रथम क्रमांक  सचिन (दिल्ली स्किल एंटरप्राइज युनिव्हर्सिटी) द्वितीय क्रमांक  कोर्बु साफिया रौफ (आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसी, धाराशिव) जागतिक फार्मासिस्ट दिवस 2025 निमित्त डिपार्टमेंट ऑफ फार्मसी, टीपीसीटीएस कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे आयोजित केलेल्या विविध स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. या स्पर्धेमध्ये सायंटिफिक मॉडेल मेकिंग स्पर्धेमध्ये कुमारी आकांक्षा जनक कुलकर्णी व शैला सुरेश चव्हाण यांनी प्रथम क्रमांक, कुमारी फिजा बाबा मिर्झा बैग व अमृता बालू माने यांनी द्वितीय क्रमांक आणि कुमारी श्रद्धा बालाजी कोळी, सोनाली संभाजी डोळे व स्वप्नाली महादेव गडकरी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या विजेत्यांचेही अभिनंदन करण्यात आले.

या सर्व स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांनी आपली कलात्मकता, सादरीकरण कौशल्य आणि औषधशास्त्रावरील आकलन प्रभावीपणे मांडले. तेरणा फार्मसीकडून सर्व विजेते आणि सहभागी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली  फार्मसी विभागाच्या प्रमुख डॉ. प्रीती माने यांनी केले होते. त्याचबरोबर डॉ. गुरुप्रसाद चिवटे, डॉ. राजेश ननवरे, प्रा. सायली पवार, प्रा. ज्ञानेश्वरी भोजने यांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयातील इतर प्राध्यापक यांनीही विद्यार्थ्यांना विविध उपक्रमासाठी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे सर यांनी देखील विद्यार्थ्यांचे कौतुक केले.


 
Top