तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूरच्या सुपुत्राने राजधानी दिल्लीमध्ये मानाचा मोठा टप्पा गाठला आहे. मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टीस, दिल्ली यांनी दि. 15 सप्टेंबर 2025 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार तुळजापूरचे सुपुत्र ॲड. नितीन सुरेश साळुंके यांची स्टँडिंग कौन्सिल फॉर युनियन ऑफ इंडिया (सरकारी वकील, भारत सरकार) या प्रतिष्ठित पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
या उल्लेखनीय नियुक्तीबद्दल तुळजापूर तालुका पत्रकार संघ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. 28 सप्टेंबर रोजी तुळजापूरमध्ये ॲड. साळुंके यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्रीकांत कदम, तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी स्वाभीमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे राष्ट्रवादीकाँग्रेस अपगट ,श्रीकृष्ण सुर्यवंशी पावणारा गणपती मंडळ अध्यक्ष गणेश साळुंके, भाऊसाहेब देशमुख आदी मान्यवरांनी उपस्थित राहून ॲड. साळुंके यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
मूळचे तुळजापूरचे रहिवासी असलेले ॲड. नितीन साळुंके हे सध्या छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात वकिली करतात. विशेष म्हणजे, ते या पदावर नियुक्त होणारे सर्वात कमी वयाचे वकील आहेत. “त्यांच्या या कामगिरीमुळे तुळजापूरचे नाव दिल्लीसारख्या राजधानीत झळकले असून, तरुण पिढीला त्यांच्या वाटचालीतून नक्कीच प्रेरणा मिळेल,“ असे मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ॲड. साळुंके यांच्या निवडीने तुळजापूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, हे यश तरुण वकिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.