भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील चिंचोली येथे रात्री अचानक आलेल्या मुसळधार पावसाने पाण्याचा प्रवाह वाढल्याने चिंचोली येथील देवनाबाई नवनाथ वारे (वय 76) यांचे शेडमध्ये पूर्ण पाणी आल्याने पाण्यामध्ये बुडून मयत झाल्या आहेत. त्यांच्यासोबत त्यांचा मतिमंद मुलगा कसाबसा बाहेर पडून तो सुखरुप वाचला आहे. भूम-नगर रोडवर वाहून आल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे.


 
Top