धाराशिव (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील प्रवाशांची दीर्घकालीन मागणी अखेर पूर्ण झाली आहे. दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड-पंढरपूर एक्सप्रेस (11413/11414) या गाडीला आता कळंब रोड स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाने अधिकृत आदेश काढून या थांब्याला मान्यता दिली आहे. अशी माहिती खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली.

रेल्वे प्रशासनाने या थांब्याला प्रायोगिक तत्त्वावर मान्यता दिली असून, लवकरच अंमलबजावणी होणार आहे. या काळात तिकीट विक्री व प्रवाशांचा प्रतिसाद यावर देखरेख ठेवून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. या निर्णयाने कळंब परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, शेतकऱ्यांना बाजारपेठेतील व्यवहारासाठी, तसेच पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांना या थांब्यामुळे मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. 


 
Top