भुम (प्रतिनिधी)-  भूम व परांडा वाशी तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. घरांची पडझड झाली असून पुराच्या पाण्यात जनावरेही वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.धाराशिव जिल्ह्याचे काँग्रेस चे नेते उमेशराजे निंबाळकर व सहकार्यांनी यांनी आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे झालेले  नुकसान पाहून त्यांनी काही रक्कम नुकसान झालेल्या आंबी,चिंचोली,चिंचपूर (ढगे) बेलगाव येथील शेतकऱ्यांना बांधावर जावून व काही कुंटूबांना प्रत्यक्ष घरी भेटून मदत दिली आहे.

यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विलास शाळू,भूम तालुकाध्यक्ष रुपेश शेंडगे, पिल्लू काकडे,अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष समीयोद्दीन काझी, अध्यक्ष दत्ता तांबे,परंडा विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मोईज सय्यद शेखापुरकर,ओ.बी.सी. विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर डोंबाळे,अभिषेक बागल विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड.मुशरफ सय्यद बाळासाहेब देशमुख,सेवादलाचे लक्ष्मण शिंदे व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top