धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त धाराशिव नगर परिषद येथील प्रांगणात बुधवार (17 सप्टेंबर) ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मराठवाड्याच्या मुक्तीसाठी बलिदान दिलेल्या शहीदांना स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली. नगरपरिषदेमार्फत झालेल्या या ध्वजारोहण कार्यक्रमामुळे स्वातंत्र्य संग्रामातील मराठवाड्याच्या ऐतिहासिक लढ्याची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली. या प्रसंगी कार्यालयीन अधीक्षक दीपक तावडे, रावसाहेब शिंगाडे, बांधकाम अभियंता वैजनाथ दृकर, प्रदीप स्वामी, सहाय्यक अभियंता सानप, पाणीपुरवठा अभियंता संग्राम भापकर, लेखपाल जयश्री पाटील, दीपक गवळी,राजकुमार शिंदे,भारत साळुंखे, रोहित मुंडे विद्युत अभियंता, स्वच्छता अभियंता महेर, पिंटू गायकवाड यांच्यासह नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.