धाराशिव (प्रतिनिधी)- दिनांक 21/09/2025 रोजी येरमाळा पोलीस स्टेशनचे प्रभारी सहा पोलीस निरीक्षक, भालेराव यांना गोपनिय माहीती मिळाली की, येरमाळा ता.कळंब जि.धाराशिव येथे एका इसमाने त्याचे घराचे पाठीमागे स्वता:च्या आर्थीक फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशिर रित्या गांज्याच्या झाडांची लागवड करुन त्याचे संवर्धन व जोपासना करीत आहे, अशी खात्रीलायक माहीती मिळाल्याने याबाबत मा.पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. पवार साहेब यांना माहीती देवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई करणे कामी माहीतीच्या ठिकाणी छापा मारला असता, येरमाळा येथील इसम नामे- भावसाहेब प्रल्हाद राउत, वय 60 वर्षेद्व रा. येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव याने आपल्या राहत्या घराचे पाठीमागील मोकळ्या जागेत अवैध गांज्याचे झाडे लावुन त्याचे संवर्धन करीत असताना मिळुन आला. त्याचे घरामागून एकुण 9 किलो 200 ग्रॅम वजनाची ओलसर गांज्याची झाडे एकुण किंमत 1,84,000  किंमतीचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे. सदर इसम यांचे विरुध्द येरमाळा पोलीस स्टेशन येथे गुरनं 262/2025  कलम 20 (ब), (), 8 (सी), 20 (अ) एन.डी.पी.एस. कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाइ पोलीस अधीक्षक रितू खोखर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधीकारी पवार यांचे मार्गदर्शनाखाली  सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव, पोउपनि भोजगुडे, आवारे, पोहेकॉ शेख, तिगाडे, पोना सय्यद पोअं पठाण, अमोल जाधव, चालक पोअं दराडे यांचे पथकाने केली आहे.

 
Top