धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या वतीने तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, नेरूळ (नवी मुंबई) यांच्या सहकार्याने धाराशिव शहरात भव्य मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरात हृदयरोग, नेत्ररोग, बालरोग, स्त्रीरोग, त्वचारोग, कान-नाक-घसा, अस्थिरोग, पोटाचे विकार अशा विविध आजारांवरील तपासणी व औषधोपचार करण्यात आले. नेरूळ येथील तेरणा हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर्स शिबिरासाठी खास उपस्थित राहून रुग्णांची तपासणी केली.
आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले की, ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, त्यांचे पुढील उपचार नेरूळ येथील तेरणा हॉस्पिटलमध्ये मोफत केले जाणार आहेत. तसेच, जे उपचार तेरणा हॉस्पिटलमध्ये शक्य होणार नाहीत, ते मुंबईतील जे.जे. आणि केईएम सारख्या नामांकित रुग्णालयांत करण्यात येणार आहेत. या शिबिरातून एकूण 852 रुग्णांनी लाभ घेतला.
हे शिबिर प्रभाग क्रमांक 17, गाझी स्कूल, खाजा नगर, शम्स चौक, धाराशिव येथे आयोजित करण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी सुनील काकडे, विनोद गपाट, आबा इंगळे, राजसिंह राजे निंबाळकर, अक्षय ढोबळे, अलीम पठाण, पटेल सर, पुष्पकात मळाळे, विलास लोंढे, जोशी, आकाश तावडे, विशाल पाटील, नाईकवाडी, बिलाल रजवी, इलियास पिरजादे, फहाद सिद्दिकी, शहबाज पठाण, मुजाहिद काझी यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले. प्रमुख पाहुण्यांचे भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा शहराध्यक्ष फर्मान काझी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी फिरोज पठाण, सुरज सैलानी, महमूद मुजावर, जाकीर पठाण, फरहान काझी, कैफ पठाण, अमजद सय्यद, रेहान काझी, बब्बू मुजावर, समीर शेख, समीर बेग, मुजाहिद शेख यांनी मोलाचे सहकार्य केले. तर आरिफ मुजावर, जैनू मुजावर, काझी अबूहुरेरा, काझी सुद, सय्यद सेहेल, अल्ताफ शेख आदींनीही शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले. सदरील शिबिर हे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे तसेच भारतीय जनता पक्ष अल्पसंख्यांक सेल धाराशिव शहराध्यक्ष फर्मान काझी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या संपन्न झाले.