धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आणि जवाहर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय अंदुर आयोजित जिल्हास्तरीय युवक महोत्सव 2025 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, धाराशिव उप-परिसराने नऊ पारितोषिके मिळवली. मिळवलेली पारितोषिके खालील प्रमाणे होत.

एकांकिका - प्रथम, प्रहसन - प्रथम, मुकाभिनय - प्रथम, मिमिक्री - प्रथम, पुरुष अभिनय - प्रथम, स्त्री अभिनय - प्रथम, दिग्दर्शन - प्रथम, विद्यार्थी लेखन - प्रथम, नाट्यविभाग जनरल चॅम्पियनशिप सर्व विद्यार्थ्यांचे उप-परिसराचे संचालक माननीय प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यांनी  खूप खूप अभिनंदन केले. तसेच नाट्यसंघासाठी मेहनत घेणारे डॉ.विक्रम शिंदे सर, डॉ.गणेश शिंदे सर आणि डॉ. उषा कांबळे मॅडम यांनी मेहनत घेतली. तसेच युवक महोत्सवास प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले अभिनेते उमेश जगताप, अभिनेते योगेश शिरसाठ आणि अभिनेत्री रूपलक्ष्मी चौगुले यांचे परिचयात्मक संक्षिप्त माहितीपट डॉ. गणेश मदनराव शिंदे यांनी बनविले ज्याचे भरभरून कौतुक झाले.


 
Top