धाराशिव (प्रतिनिधी)-  बीड, सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यातून मोटारसायकलची चोरी करणारे व चालत्या वाहनातून केबल व पशुखाद्य चोरणाऱ्या गुन्हेगारास स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, मालाविषयी गुन्हे उघडकीस आणणे अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, सिद्राम पोपट पवार व रमेश राजाभाऊ पवार रा. वरूडा पारधी पिढी यांनी कोठुन तरी मोटारसायकली, केबल वायर व खापरी पेंडीचे पोते चोरून आणुन त्यांचे घराचे बाजुला असलेल्या शेडमध्ये ठेवले आहेत. अशी माहिती मिळाल्याने पथकासह जावुन नमुद आरोपीचा शोध घेतला असता ते पळुन जात असताना त्यांना शिताफीने पकडुन ताब्यात घेतले. त्यांचे घराचे आजुबाजुची पाहणी केली असता बाजुस असलेल्या शेडमध्ये लावलेल्या मोटारसायकली, केबल वायर व खापरी पेंडीचे पोते मिळुन आले. त्याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी मोटारसायकली या धाराशिव, भुम, सोलापुर, बीड, केज येथुन आम्ही दोघांनी व केबल वायर, खापरी पेंडीचे पोते हे धाराशिव येथून दुकानातुन व वरूडा रोडवरून जाणारे ट्रकमधुन आम्ही दोघे व आमचा एक साथीदार असे मिळुन चोरून आणले असल्याचे सांगितले. बीड, सोलापूर, धाराशिव जिल्ह्यातील 05 चोरीच्या मोटार सायकली व केबल वायर, खापरी पेंडीचे पोते असे 2 लाख 5 हजार 483 रूपयांचा मुददेमाल जप्त करून आरोपींना पोलिस स्टेशन आनंदनगर येथे हजर केले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके, सपोनि अमोल मोरे, पोह विनोद जानराव, अमोल निंबाळकर, नितीन जाधवर, मपोह शोभा बांगर, पोना बबन जाधवर, चापोह महेबुब अरब, विनायक दहिहंडे, प्रकाश बोईनवाड यांचे पथकाने केली आहे.

 
Top