कळंब (प्रतिनिधी)- ज्यांची स्वतःच्या कागदपत्रांवर कुणबी नोंद नाही, असे मराठा बांधव नातलगांच्या किंवा कुळातील व्यक्तींच्या कुणबी नोंदींच्या आधारे प्रतिज्ञापत्र सादर करून कुणबी प्रमाणपत्र मिळवू शकतात. घडी गेली तर पिढी जाते यासाठी मराठवाड्यातील मराठा बांधवांसाठी हैद्राबाद गॅझेटियर ही एक मोठी कुणबी प्रमाणपत्र मिळविण्याची संधी आहे. या संधीचा जास्तीत फायदा घेऊन शैक्षणिक, नोकरी व इतर सवलतीचा फायदा घ्यावा असे मत प्रा.जगदीश गवळी यांनी व्यक्त केले.

मंगरूळ येथे आयोजित मराठा आरक्षण विजयोत्सव, कुणबी प्रमाणपत्र मार्गदर्शन व नागरी सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल गायकवाड, ॲड. घनश्याम रितापुरे, भागचंद बागरेचा, संजय पाटील, बिभीषण गायकवाड, बाळासाहेब काळे, लक्ष्मण रितापुरे, हेमंत रितापुरे, कपिल रितापुरे, राजाभाऊ भराडे, अमृत जाधव, गणेश भोसले, भास्कर जाधव, उमराव काळे, मनोज काळे, निखिल रितापुरे, हनुमंत रितापुरे, बिभीषण निंबाळकर, अरुण जाधव, अतुल रितापुरे, मच्छिंद्र जगताप, चंद्रकांत रितापरे, सुनील भराडे, जब्बार शेख, सादिक तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा. गवळी म्हणाले की, मराठवाड्यातील मराठा हा गरजवंत असून निजामी राजवटीमुळे बहुतांश या भागातील कागदोपत्री नोंदी आढळून आलेले नाहीत. त्यामुळे ज्यांच्या कुणबी नोंदी आढळून आलेले आहेत अशा वडीलाकडील नातलगाच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे सरकारने कुणबी दाखला देण्याबाबत

ग्रामस्तरावर व तालुका स्तरावर चौकशी समिती नेमलेली असून, ग्राम विकास अधिकारी, महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी समितीच्या अहवाला आधारे रोटी बेटी व्यवहार, पेहराव, सण उत्सव, चालीरिती अशी सामाजिक पार्श्वभूमी व सादर पुरावे पाहून कुणबी प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या लढ्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी अथक प्रयत्न केल्याबद्दल ॲड. घनश्याम रितापूरे यांचा ग्रामस्थाच्यावतीने नागरी सत्कार करण्यात.

यावेळी अतुल गायकवाड यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाले यासाठी आण्णासाहेब पाटील यांच्यासह अनेक तरुणांना आपले बलिदान द्यावे लागले. आज मनोज जरांगे यांनी समाजाला न्याय देऊन खरी श्रध्दांजली वाहिली आहे. या मावळ्यांचे समाजाने कायम स्मरण ठेवावे असे मत व्यक्त केले. ॲड घनश्याम रितापूरे नागरी सत्काराला उत्तर देताना कुणबी चा शेवटच्या मराठ्यांना जोपर्यंत लाभ होत नाही तोपर्यंत कार्य करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाभाऊ रितापुरे यांनी केले. तर सूत्रसंचालन अभिजित झाडके यांनी केले. आभार वैभव काळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमृत जाधव, शरद रीतापुरे यांच्यासह गावकऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top