तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापुर तालुक्यातील मौजे बारुळ येथील बारुळ जवळगा मेसाई रस्तावरील असलेला प्रकाश डेव्हलपर चा सिमेंट काँक्रिटच मिक्सर प्लांट अनधिकृत चालू आहे. या पूर्वीच ग्रामपंचायतने सदरील प्लांट नोटीस देऊन बंद करण्याची सूचना देऊन हि मग्रूर कंपनी त्याला केराची टोपली दाखवून तसाच चालू ठेवण्यात आला आहे. सदरीलप्लांट हा ग्रामपंचायत हद्दीत असून त्यांची नाहरकत प्रमाणपत्र न घेताच कामाला सुरुवात केली. आज प्लांट चालू होऊन वर्षे उलटून गेला आहे. प्लांट मधून निघणारा धूळ यामुळे सभोवतीलची शेकडो एकर जमीन नापीक होण्याची भिती असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. यामधून उत्खनन केलेल्या मुरुमाची रॉयल टी चा भरणा केला नाही, सदरील प्लांट हा व्यवसायिक दृष्ट्या उभा केला असल्याने त्यां जागेचा कसलाही व्यवसायिक अकृषिक परवानगी घेतली नाही. या सर्व गोष्टीचा विचार करता प्रशासन ही मूग गिळून का गप्प आहे ? असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकास पडला आहे. सदरील बेकायदेशीर प्लांट तात्काळ बंद करून ,त्यांचावर योग्य ती कार्यवाही करावी तरी अशी मागणी लोकांमधून होत आहे.