तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्री तुळजाभवानी मातेकडुन आशिर्वाद रुपी  भवानी तलवार स्वीकारताना छत्रपती शिवाजी महाराज, या दृश्यातील भवानी तलवार महालंकार पूजा सोमवार, 28 सप्टेंबर रोजी देवीच्या सिंहासनावर मांडण्यात आली. या पूजेला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असून त्यामुळे दर्शनासाठी भाविकांची गर्दी लक्षणीय दिसून आली. आज जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषांने मंदीर दणाणुन गेले होते  शारदीय नवरात्रोत्सवातील तुळजाभवानी अलंकार महापूजा

पाहण्यासाठी मंदिरात सुमारे लाखो भाविकांनी गर्दी केली होती. 

यावेळी जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषाने तुळजाईनगरी दुमदुमून गेली होती. भवानी तलवार पूजेच्या कालावधीत जय भवानी, जय शिवाजी..आई राजा उदो ऽऽ उदोच्या गर्जनांनी मंदिर परिसर दणाणून गेला होता. शारदीय नवरात्रोत्सवात प्रतिवर्षी ही पूजा  मांडली जाते. देवी तुळजाभवानी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील ऐतिहासिक क्षण यानिमित्ताने प्रगट केला जातो. संकटसमयी भवानीमातेने प्रगट होऊन शिवाजी महाराजांना तलवार दिली. अन्यायी राजवटीच्या निर्दालनासाठी व न्यायी स्वराज्य निर्माण करण्यासाठी भवानीमातेने दिलेला हा आशीर्वाद मानला जातो. त्यामुळे तुळजाभवानी मंदिरात भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात येते. अतिप्राचीन देवस्थानात एखाद्या राजाला थेट सिंहासनावर पुतळ्याच्या रूपात अधिष्ठान मिळणे हे दुर्मिळ असून यातून छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी व भवानीमातेशी त्यांचे नाते स्पष्ट होते.  सातव्या माळेदिनी रविवारी राञी मंदीरात घोडा वाहनावर छबिना काढण्यात आला.

 
Top