मुरुम (प्रतिनिधी)- येथील टिळक चौक नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने परिसरातील नागरिकांसाठी आरोग्यविषयक शिबिराचे आयोजन रविवारी (ता. 28) रोजी करण्यात आले. यामध्ये नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू व सर्वरोग निदान तपासणी शिबिरसह रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजप युवानेते शरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे येथील एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय चे डॉ. संभाजी जगदाळे यांनी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे मार्गदर्शन केले. उमरगा येथील शेंडगे हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर सर्वरोग निदान तपासणी डॉ. हारून मुजावर, डॉ. विशाल पवार, सुरज बोडके, प्रांजली भैसारे, निकिता दरो, प्रिया कांबळे, पंकज चव्हाण, आनंद चव्हाण, पुनम मते, व्यंकट चिंचोळे आदींनी काम केले. उमरगा येथील श्रीकृष्ण रक्तपेढीचे विजय केवडकर, ऋतिक म्हेत्रे, स्वप्नील देशमुख, पुजा पुजारी आदींनी परिश्रम घेतले. याप्रसंगी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच उत्सव समितीचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. या शिबिराचा शेकडो अबाल वृद्धांनी लाभ घेतला. नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने घेतलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.