धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये प्रशालेतील गोरगरीब, मातृपितृ छत्र नसलेल्या अशा अनेक कारणांमुळे विद्यार्थी शालेय गणवेशापासून वंचित राहू नये म्हणून प्रशालेत विद्यार्थी कल्याण विभागाच्यावतीने इ.5 वी 7 वीच्या 51 मुले - मुलींना गणवेश वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्षा म्हणून आदर्श शिक्षण मंडळाच्या सरचिटणीस सौ. प्रेमाताई सुधीर पाटील तर प्रमुख पाहुणे शहरातील दंतचिकित्सक डॉ. विशाल सारडा, संस्था प्रशासकीय अधिकारी साहेबराव देशमुख उपस्थित होते त्याच बरोबर प्राचार्य तथा मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक यशवंत इंगळे, बी.बी. गुंड, सुनिल कोरडे, राजेंद्र जाधव, डॉक्टरेट विनोद आंबेवाडीकर,बालाजी गोरे, शिक्षक एन.एल. गोरसे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विभागातील शिक्षक शिक्षिका सुर्यकांत पाटील, सुरेखा देशमाने, संगिता शिंदे, विश्वास शेवाळे, नितीन कदम, संतोष देशमुख, छायाचित्रण शिवाजी भोसले, सुरज सपाटे, कलाध्यापक शेषनाथ वाघ सेवक नाईक सुहास काटे व सहकारी शिक्षक शिक्षिका वृंद यांनी परिश्रम घेतले . सुत्रसंचालन व आभार सूर्यकांत पाटील यांनी मानले.


 
Top