धाराशिव (प्रतिनिधी)- व्ही पी शैक्षणिक संकुल छत्रपती संभाजी नगर रोड, धाराशिव येथील श्री साई जनविकास आय टी आय मध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयुध पूजन, नवीन प्रवेशीत प्रशिक्षणार्थीचे स्वागत व उत्तीर्ण गुणवंत प्रशिक्षणार्थीचे सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे येडशी येथील उद्योजक तानाजी  जाधव ,प्राचार्य डॉ. सुरज ननवरे,इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य अमरसिंह कवडे, कृषि महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रा. हरी घाडगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या व भगवान विश्वकर्मा यांच्या  प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ. सुरज ननवरे सांगितले की, औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण करताना शस्त्राचा (साधनांचा) योग्य वापर, त्यांची जपणूक व सन्मान याला विशेष महत्त्व आहे. पूजनाद्वारे कार्यावरील श्रद्धा आणि कौशल्य वृद्धिंगत होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. प्रशिक्षणार्थीनी  नवीन तंत्र ज्ञान आत्मसात करावे असे आव्हान प्राचार्य  अमरसिंह कवडे यांनी केले. यावेळी नवीन प्रवेशीत प्रशिक्षणार्थीचे  स्वागत गुलाब पुष्प  व शालेय किट देऊन व उत्तीर्ण  गुणवंत  प्रशिक्षणार्थीचे सन्मान प्रशस्ती पत्रक देऊन करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून येडशी  येथील  उद्योजक  तानाजी  जाधव, एस. बी. एन. एम. फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरज ननवरे, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य अमरसिंह कवडे, कृषी महाविद्यालयाचे हरी घाडगे  उपस्थित होते तर व्ही पी शैक्षणिक संकुलाचे लेखापाल योगेश मंडलिक , रामचंद्र सुतार,महेबूब मुजावर आदी मान्यवरांचा सहभाग होता. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे व्यवस्थापक डी.एम.घावटे, निदेशक सुनील पुदाले, निदेशक  सागर सुतार, निदेशक सुमंत भोरे, निदेशक अभिजीत वीर, व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डी.एम. घावटे यांनी मानले.

 
Top