धाराशिव (प्रतिनिधी)-  सर्व शिक्षक शिक्षक संघटना समन्वय समितीची बैठक शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्या दालनात संपन्न झाली. यामध्ये कोरोना काळात शिक्षकांनी जमवलेले जवळपास एक कोटीची रक्कम धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी देण्याचे एकमताने ठरले. त्याप्रमाणे निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांना शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकारी यांच्या खात्यावर आलेला 1 कोटी रूपये निधी पुरग्रस्तांसाठी द्यावा अशा प्रकारचे पत्र सर्व शिक्षक संघटनेने दिले आहे. 

कोरोना काळात सर्व शिक्षकांनी आपला एक दिवसाचा पगार धाराशिव जिल्ह्याच्या कोविड खात्यामध्ये जमा केला होता. पण तो निधी खर्च न झाल्यामुळे सर्व शिक्षक संघटनाच्या प्रतिनिधींनी सदर निधीतून तुळजापूर येथे भाविकांसाठी शिक्षक भवन उभारण्याबाबत निर्णय घेतला होता. पण त्याबाबत ही शिक्षक संघटनेची ती मागणी पूर्ण झाली नाही. सध्या धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके पुरामध्ये वाहून गेली आहेत. अनेक शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत करोडो रुपयांची वित्तहानी शेतकऱ्यांची झाल्यामुळे सर्व शिक्षक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी आज एकत्र येऊन शिक्षक भवनासाठी ठरलेला निधी न वापरता धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना सदर निधी देण्याविषयी एकमत करून तसा प्रस्ताव शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आला. 

सदर बैठकीस अखिल शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर,जिल्हाध्यक्ष बशीर तांबोळी, शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे,जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बिभीषण पाटील,शिक्षक समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य कल्याण वेताळे, जिल्हाध्यक्ष रमेश बारस्कर पुरोगामीचे शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अभय यादव,एकल संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष श्री पवन सूर्यवंशी,अपंग शिक्षक संघटनेचे कदम, मागासवर्गीय शिक्षक संघाचे संघटनेचे अध्यक्ष चंदन लांडगे,कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष बापू शिंदे,सहकार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब घेवारे उर्दू शिक्षक संघटनेचे अध्यक्ष तय्यब अली शहा, महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे श्री विकास मुळे तसेच इतर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top