भूम (प्रतिनिधी)- भूम शहरात शहरात घरोघरी गौरी गणपती बसवण्यात आले आहेत. आरास करून विविध प्रकारे रोषणाई, आकर्षक सजावट,करून गौरीचे थाटामध्ये आगमन झाले आहे. आपल्या हिंदू धर्मात सण-उत्सवाचे आगळे-वेगळे महत्त्व आहे. दि. 31 ऑगस्ट रोजी गौरीपूजन होईल, एक सप्टेंबर रोजी विविध प्रकारच्या भाजी व पुरणपोळीचा नैवेद्य तयार केला जातो. तर 2 सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन होणार आहे. काही घरात ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा दोन गौराई बसवण्यात आल्या आहेत.

आकर्षक सजावट करून गौराईचे स्वागत घराघरात करण्यात आले. आज रात्रभर साऱ्या माहेरवाशिणी खेळ खेळून सण साजरा करणार आहेत. आवाहनानंतर तिसऱ्या दिवशी पुढच्या वर्षी पुन्हा या असे सांगून गौरीचे विसर्जन केले जाणार आहे.

 
Top