तुळजापूर (प्रतिनिधी)-  धाराशिव राष्ट्रीय महामार्गावर बोरी परिसरात कार पलटी होऊन झालेल्या या अपघातात चालकासह एक जण जखमी झाले असून, जीवितहानी टळली आहे.

शनिवार दि. 1 सप्टेंबर रोजी दुपारी 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास एम.एच-25-ए.एल-5521 क्रमांकाची आय-20 कार धाराशिववरून तुळजापूरकडे येत होती. बोरीजवळ अचानक रस्त्यावर कुत्रा आल्यामुळे कार चालकाचे नियंत्रण सुटले व गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली. ऑटोमध्ये जखमींना तातडीने तुळजापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात माजी नगरसेवक पंडितराव जगदाळे यांचा पुतण्या सुरज जगदाळे व त्यांचा मित्र हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 
Top