भुम (प्रतिनिधी)- क्रिडा संकूलन भूम येथे झालेल्या तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत 14 वर्ष वयोगटात श्री गुरुदेव दत्त हायस्कूलच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले व तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला.
या संघाची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे. एकूण तीन संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. फुटबॉल संघामध्ये साईराज दहिटणेकर, मिसाळ अनित्य, धावारे सम्यक, क्षीरसागर शार्दुल, होडशीळ कार्तिक, भोसले अवधूत, तेलंगे अर्णव, जिकरे सार्थक, समर्थ कुमठेकर, धुमाळ संजय, वनवे तेजस, साबळे पृथ्वीराज, चाऊस फरहान, साबळे सार्थक, दराडे शशिकांत, बारबोले स्वराज व ओमराज आसलकर या सर्व वरील गुणवंत खेळाडूंचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव मोटे, सचिव तथा पर्यवेक्षक सतीश देशमुख, हायस्कूलचे मुख्याध्यापक भोसले माधव व प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका अंजना मुंडे, क्रीडा शिक्षक आप्पा मिसाळ व जयंत शिंदे यांनी केला व त्यांना जिल्हास्तरासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
