तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला बळ मिळावे आणि आंदोलनाचे नेतृत्व करणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील दीर्घायुषी राहावेत, यासाठी आज सकाळी 10 वाजता आई तुळजाभवानी मंदिरात पुजारी बांधव वतीने सामूहिक महाआरती करण्यात आली.
देवी चरणी उभे राहून सर्व पुजारी मंडळी धवांनी प्रार्थना केली.“देवी, मनोज पाटील यांना बळ दे, ताकद दे, समाजाच्या मागण्या तातडीने मान्य होऊ दे.”
यावेळी बाळासाहेब भोसले, दादांचे पुजारी कुमार टोले, ऍड. धीरज जाधव, प्रशांत इंगळे, शाहूराज मगर, दिगंबर खूंटाफले, सचिन अमृतराव, शंभूराजे इंगळे, नितीन जत्ते, बापूसाहेब करडे, जीवन अमृतराव, ओंकार टोले, शुभम भोसले यांच्यासह समस्त पुजारी बांधव आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
