तुळजापूर (प्रतिनिधी)-  मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून तुळजापूर शहरातही संतप्त आंदोलन सुरु आहे 

श्रीमंत राजयोगी पावणारा गणपती राजा कंपनी तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष रमेश रोकडे यांनी सहकाऱ्यांसह अर्धनग्न आंदोलनाला सुरुवात केली आहे. “जोपर्यंत मनोज जरांगे पाटली यांचे आंदोलन संपत नाही, तोपर्यंत आम्ही तुळजापूर शहरात शुक्रवार पेठ येथे आंदोलन सुरू ठेवू,“ असा निर्धार रोकडे यांनी व्यक्त केला. हटके ठरणारे हे आंदोलन आता तुळजापूर शहराच्या राजकीय-सामाजिक वातावरणात चर्चेचा विषय ठरले आहे.


 
Top