तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील पीएमश्री जिल्हा परिषद उर्दू शाळा येथील उपक्रमशील शिक्षक मौला शेख यांना महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना जिल्हा शाखा लातूर यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष एम. ए. गफ्फार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ.शिवाजी काळगे, आमदार विक्रम काळे , मोईज शेख , मुजीब पटेल उपस्थित होते. लातूर येथे मान्यवरांच्या हस्ते मौला शेख यांचा शाल, मेडल, ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. सोहळ्याचे आयोजन संघटनेचे जिल्हाध्यक्ष नुसरत कादरी यानी केले होते.या पुरस्काराबद्दल जिल्हा परिषद उद्रू शाळेचे मुख्याध्यापक तय्यबअली शहा यांनी अभिनंदन केले.