धाराशिव (प्रतिनिधी) - महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेमार्फत समाजउन्नती, शैक्षणिक प्रगती आणि स्वावलंबनाच्या दिशेने एक पाऊल टाकत मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी, राज्य समन्वयक दीपक जोशी, उद्योजक दत्ताभाऊ कुलकर्णी, आशिष मोदाणी हे उपस्थित राहणार आहेत. हा मेळावा शनिवार, 20 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता धाराशिव शहरातील मारवाड गल्ली येथील बालाजी मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक चिन्मय कुलकर्णी, जिल्हा उपव्यवस्थापक अजय कुलकर्णी यांनी केले आहे.

या मेळाव्यात विविध लक्षित समाजातील उमेदवारांना विशेष आमंत्रीत करण्यात आले आहे. यामध्ये ब्राह्मण, मारवाडी, कोमटी, ठाकुर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बनिया, बंत्स, कम्मा, नायर, अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राज पुरोहित, नायडू, एलमार आदी समाजातील इच्छुक उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा.

 
Top