धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने कहर केला असुन  हाता तोंडाला आलेल्या खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान  होऊन शेतकऱ्यांचे कधींही न भरुन येणारे नुकसान झाले आहे. धाराशिव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, तात्काळ शेतकरी कर्जमाफी करण्याची मागणी मनसेने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

दिलेल्या निवेदना असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करुन तत्काळ कर्जमाफी करावी. जिरायत शेतीपिकासाठी हेक्टरी 1लाखाची मदत करावी. बागायत शेती पिकासाठी हेक्टरी 1.50लाखाची मदत करावी. फळबाग शेती पिकासाठी हेक्टरी 2लाख मदत करावी. ओल्या दुष्काळात मृत पावलेल्या शेतकरयांना 10लाख रुपये देऊन कूटूबातीलू व्यातीला शासकीय नौकरी देण्यात यावे. ओल्या दुष्काळात मृत पावलेल्या जानावरा मागे 75हजार रुपये देण्यात यावे. जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये देण्यात यावे. घरांची पडझड झालेल्या नागरिकांना घरकुल योजनेचा माध्यमातून घरे बांधून देण्यात यावे. अशा मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने धाराशिव जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे, धाराशिव तालुका अध्यक्ष सलीमभाई औटी, शहर अध्यक्ष नितेश जाधव, शिक्षण सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बचाटेसर,शिक्षक सेनेचे नेते बबनराव वाघमारे सर, तालुका सचिव प्रशांत मगर,ढोकी शहर अध्यक्ष पदमनाभ जोशी, महाराष्ट्र सैनिक रामचंद्र नेटके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top