धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये येत्या ऑक्टोम्बर महिन्यापासून ' कॅम्पस टू कॉर्पोरेट ' या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या संदर्भात दिनांक 11 सप्टेंबर 2025 कॉलेज मध्ये सर्व विद्यार्थ्यांना या उपक्रमाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदरील कॅम्पस टू कॉर्पोरेट' या संस्थेचे प्रमुख तथा बी आर फिल्मचे संचालक श्री. धीरज धवन आणि प्रशिक्षक श्री. अमोल धुरी यांनी मुलांना मार्गदर्शन केले. सदरील प्रोग्रॅम हा विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्यासाठी अतिशय उपयुक्त असून जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार व भरघोस पॅकेजवर नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी मिळण्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कार्पोरेट अपेक्षांनुसार कौशल्य विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट सेक्टरमध्ये अधिक अधिक प्लेसमेंटच्या संधी उपलब्ध होणार आहेत. असे प्रतिपादन संस्थेचे हेड धीरज धवन यांनी केले.
आजच्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या कॉर्पोरेट संस्कृतीत चमकण्यासाठी आवश्यक असलेली टेक्निकल स्किल, सॉफ्ट स्किल्स आणि सामाजिक कौशल्ये वाढीची अत्यंत गरज आहे. या प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने असे म्हणाले कि “सदरील नाविन्यपूर्ण उपक्रम हा पहिल्या वर्षा च्या विद्यार्थ्यांपासून ते शेवटच्या वर्षाच्या मुलांसाठी राबविण्यात येणार आहे आणि तो सर्व विद्यार्थ्यांमध्ये दिवसेंदिवस कौशल्य वाढ झाल्याचे बदल घडवून आणण्यासाठी उपयोगी ठरणारा आहे. या कार्यक्रमामुळे विद्याथ्यांचे टेक्निकल स्किल, सॉफ्टस्किल,सामाजिक कौशल्ये विकसित होणार आहेत. या कॅम्पस टू कॉर्पोरेट कार्यक्रमाच्या अखेरीस, विद्यार्थ्यांना व्यवसाय कौशल्य, टीमवर्क आणि नेतृत्व यांचा एक मजबूत पाया मिळेल, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाची पातळी उंचावून पहिल्या दिवसापासून ते कॉर्पोरेट जगामध्ये प्रभावीपणे काम करू शकतील. सदरील एक दिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यासाठी महाविद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख आणि ट्रैनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे सर्व समन्वयक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
