तुळजापूर (प्रतिनिधी)- हरियाणा राज्यातील पानीपत येथे कृषीउत्पन्न बाजार समिती माजी सभापती विजय सर गंगणे मिञ मंडळाने जावुन रविवार दि14रोजी शहीद मराठा वीरांना तुळजापूरच्या परंपरेनुसार पिंडदान व महाळ विधी विजय गंगणे यांनी करून आदरांजली अर्पण करण्यात आली.
पितृपक्ष म्हणजे आप्तस्वकीयांचे स्मरण, पण यंदा पाणीपतच्या रणांगणावर शौर्य आणि श्रद्धेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. इतिहासात प्रथमच, पाणीपत येथे शहीद मराठा वीरांना तुळजापूरच्या परंपरेनुसार पिंडदान व महाळ विधी करून आदरांजली अर्पण करण्यात आली. रविवार सकाळी 10:30 वा. विजय गंगणे मित्र मंडळाच्या वतीने, मंत्रोच्चारात आदरांजली वाहण्यात आली.
या प्रसंगी मराठा तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. रोड मराठा व फक्त मराठा मंडळ अध्यक्ष रामचरण सिंग व स्मारक ट्रस्ट मंडळ संस्थापक अध्यक्ष प्रदीपजी पाटील रामनारायण राममेहर मराठा नीरज मराठा सतीश मराठा सुनिल मराठा राजेश मराठा जोंगिदर मराठा सतिश कदम करनाल सुनील मास्टर कुरुक्षेञ उपस्थितीत होते. यावेळी सिंग पाटील म्हणाले कि, “इतिहासात कधीच न घडलेला विधी तुळजापूरकरांनी पाणीपत रणांगणावर केला. हे बलिदानाचे स्मरण होईल. यावेळी शौर्य प्रतिमा भेट देण्यात आल्या. तर विजय गंगणे, जयकुमार पांढरे, शशी आप्पा जोत, संतोष इंगळे आदींनी या उपक्रमात मोलाचा वाटा उचलला.