वाशी (प्रतिनिधी)-येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात मुलींचे हिमोग्लोबिन तपासण्याचे शिबिर घेण्यात आले.हे शिबिर वाशी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कवडे डी.बी. व तालुका अरोग्य अधिकारी डॉ.महेंद्रकर जी.आर. यांच्या मार्गदर्शनाखाली  राबवण्यात आले.

शहरातील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी आणि आरोग्य विभागामार्फत तालुका आरोग्य साहायक व आरोग्य सेवक व आशा ताई यांच्या कडून 11 वी व 12 वी या वर्गात शिक्षण घेत असलेल्या मुलींची हिमोग्लोबीन () तपासणी मोहीम राबवण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक कदम,विज्ञान विभागाचे समन्वयक अजित तिकटे, मिलिंद शिंदे, कदम मॅडम,मोरे मॅडम व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थिनी उपस्थित होते.


 
Top