भूम (प्रतिनिधी)- भूम-बोरिवली बस नेहमीप्रमाणे शुक्रवारी दि. 5 सप्टेंबर रोजी रवाना झाली. पुणे येथे जाण्यासाठी परंडा येथून सुवर्णा कोंडलकर बसमध्ये चढल्या. त्यांनी जवळील पिशवी बसमधील रॅकवर ठेवली होती. परंडा स्थानकातून निघाल्यानंतर सुवर्णा कोंडलकर यांच्या लक्षात आले की, मोबाईल त्यांच्या हातात नाही. त्यांनी पिशवीत शोध घेतला, पण मोबाईल मिळाला नाही. त्यांनी तत्काळ वाहक मिलिंद वाघमारे यांना सांगून बस थांबवली आणि मोबाईल खरेदी केलेल्या दुकानात गेल्या.
मात्र, मोबाईल तिथेही सापडला नाही. थोड्याच वेळात त्यांच्या लक्षात आले, मोबाईल रॅकमध्ये ठेवलेल्या पिशवीतून खाली पडला असावा. दुकानदारांनी वाहकांचा संपर्क क्रमांक मिळवून कोंडलकर यांचा संदेश पोहोचवला. वाहक मिलिंद वाघमारे यांनी बसमधील रॅक तपासला असता मोबाईल तिथेच सापडला. बोरिवलीहून परत येताना वाघमारे यांनी 16 हजार रुपये किंमतीचा मोबाईल सुवर्णा कोंडलकर यांच्याकडे सुपूर्त केला. यावेळी श्रीकांत नलबे उपस्थित होते. दोघांनीही चालक आणि वाहकाचे आभार मानले.
