तुळजापूर (प्रतिनिधी)- बंजारा समाजाची आरक्षणाची मागणी ही अनेक दशकांपासून प्रलंबित असून, ती जुनीच मागणी आहे. या मागणीसाठी तत्कालीन पंतप्रधान, मुख्यमंत्री व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे संत श्री रामराव महाराजांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. समाजहितासाठी सर्व मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन संत सेवालाल महाराजांचे वंशज शेखर महाराज यांनी नळदुर्ग येथील मार्गदर्शनपर सभेत केले.
रविवार दि. 7 सप्टेंबर रोजी नळदुर्ग येथील श्री अंबाबाई मंदिर सभागृहात बंजारा समाजाच्या आरक्षणाविषयी महत्त्वाची बैठक झाली. समाजाच्या भवितव्यासाठी अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करण्यात आली. या बैठकीतील ठराव व मागण्या पुढीलप्रमाणे राज्यातील बंजारा समाजाचा समावेश प्रवर्गात व्हावा.निजाम काळातील हैद्राबाद गॅझेट तसेच 1881 ते 1941 च्या जनगणना नोंदी तपासून शासनाने निर्णय घ्यावा.सरकारने समिती गठीत करून आरक्षणाचा निर्णय लवकर घ्यावा.मागण्या न मानल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल.असे
बैठकीत ठराव घेण्यात आला. 17 सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यातील बंजारा बांधवांच्या वतीने पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांना निवेदन दिले जाणार आहे. असे यावेळी जाहीर करण्यात आले. प्रारंभी प्रास्तविक जिप सदस्य प्रकाश चव्हाण यांनी केले. यावेळी निवृत्त नायब तहसीलदार माणिकराव चव्हाण, प्रवीण पवार, संतोष चव्हाण, सुरेश पवार, लक्ष्मण चव्हाण, डॉ. सुरज चव्हाण, गुलाबदास चव्हाण, किरण राठोड, माजी नगरसेविका छमाबाई राठोड, अँड. राज राठोड, दामाजी राठोड, वसंत पवार, सुशील राठोड, सचिन जाधव, उपसरपंच अमृता चव्हाण, माजी सरपंच बालाजी राठोड, पत्रकार शिवाजी नाईक यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातील बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन हरिश जाधव यांनी मानले.
