धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यात या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीच्या आणावा घेतला यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महिला कघोष पोलीस अधीक्षक रितू खोखार निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती

आठवले यावेळी म्हणाले की, अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीने बाधित झालेली कोणताही व्यक्ती ही मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे.केंद्र सरकारकडून बधितांना मदत मिळाली , यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

पुजार यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची यावेळी माहिती दिली.सप्टेंबर महिन्यात आलेल्या झालेल्या अतिवृष्टीमुळे 2 लक्ष 26 हजार 706 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून 1037 घरांची अंशतः पडझड झाली आहे.207 जनावरांचा मृत्यू झाला असून सर्वाधिक नुकसान भूमी,परंडा व वाशी तालुक्यात झाले आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

या आढावा सभेला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.केत, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.आसलकर, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता श्री.आडे,पशुसंवर्धन विभागाचे उपआयुक्त श्री.घाटे,समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन केवले यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 
Top