धाराशिव  (प्रतिनिधी) - शिवसेना (ठाकरे) चे धाराशिव-कळंब विधानसभा अध्यक्ष शौकत शेख यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत आय.एन.डी. २०२५ श्री चा मुबारक शेख हा मानकरी ठरला आहे.

धाराशिव शहरातील शम्स चौकातीत हॉलमध्ये उस्मानाबाद जिल्हा हौशी बॉडीबिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेने शेख शौकत भाई मित्र मंडळ व फिटनेस क्लब बॉडी बिल्डर्स यांच्या संयुक्त विद्यमाने शरीरसौष्ठव स्पर्धा आय.एन.डी. २०२५ श्री चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आ कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे धाराशिव-कळंब विधानसभा अध्यक्ष शौकत शेख, शिवसेनेचे धाराशिव शहराध्यक्ष सोमनाथ गुरव, माजी नगरसेवक खलील सय्यद, अबरार कुरेशी, तोफिक काझी, शिवसेनेचे अल्पसंख्या उप जिल्हाध्यक्ष इरफान शेख, युवा सेनेचे शहराध्यक्ष कलीम कुरेशी, छोटा साजिद, बड्डू भाई, बबलू पठाण, नासिर काझी, पप्पू काझी, मिलिंद पेठे, अमजद शेख, बबलू पठाण, सिताराम कांबळे, करण कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ५०, ५५ व ६० किलो वजनावरील तरुणांच्या तीन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. तर या स्पर्धेत स्पर्धकांनी २५ तरुणांनी सहभागी नोंदविला. तसेच सहभागी स्पर्धकांनी आपल्या पिळदार शरीरसौष्ठवच्या वेगवेगळ्या व एकापेक्षा एक अदांचे सादरीकरण करुन उपस्थितांना प्रेरणादायी आरोग्य संपन्नतेचा संदेश दिला. तीन्ही गटातील स्पर्धकांचा अंतिम मुकाबला मुबारक शेख, अमन पठाण व कैफ बागवान यांच्यात अतिशय रंजक व सर्वांच्या नजरा खिळवून ठेवणारी रस्सीखेचने पहायला मिळाला. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये यावर्षीचा विजेता कोण ठरणार ? याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र, पंचांनी सर्व कसोट्यांच्या आधारे योग्य निर्णय देत मुबारक शेख यांना आय.एन.डी. २०२५ श्री घोषित केले. यावेळी खा. राजेनिंबाळकर, आ. पाटील, शौकत शेख यांच्यासह प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बॉडी बिल्डर्संना ट्रॉफी, सिल्व्हर मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे पंच म्हणून शकील बडेघर व शफी शेतंसंदी यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शौकत शेख यांनी तर सूत्रसंचालन शेख सादीक सत्तार उपस्थितांचे आभार अबरार कुरेशी यांनी मानले. या स्पर्धेचे पंच म्हणून बडेघर व शफी शेतंसंदी यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी शेख शौकत भाई मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी शरीरसौष्ठव प्रेमी तरुण यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या स्पर्धेत केदार साळुंके, मुबारक शेख, अमन पठाण, कैफ पठाण, गौस कागदी, अभिषेक भालेराव, अल्तमश शेख, अलीम मुजावर, अम्मार शेख, अमन सय्यद, अमन पठाण, जैद पठाण, अर्शान पठाण, सर्फराज पठाण, आयान मोमीन, यासीन मर्चंट, सिध्दू भालेराव, इम्रान शेख व प्रदीप पवार यांच्यासह इतरांनी सहभाग नोंदविला.

 
Top