धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, धाराशिवतर्फे ०५ - औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूक- २०२५ अंतर्गत नवीन मतदार यादी तयार करण्यासंदर्भात कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या कार्यालयाच्या आदेशानुसार औरंगाबाद,पुणे व नागपूर विभागातील पदवीधर तसेच अमरावती व पुणे विभागातील शिक्षण विधानपरिषद मतदारांसाठी नवीन मतदार यादी तयार करण्याचे काम नियोजित केले आहे.
श्री जितेंद्र पापळकर,मतदार नोंदणी अधिकारी, ०५-औरंगाबाद विभाग, यांनी मतदार नोंदणी नियम १९६० च्या नियम ३१(३) अंतर्गत मतदार यादी तयार करण्याची कार्यवाही सुरु केली असल्याची माहिती दिली आहे.यासंबंधी अधिक माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर (https://dharashiv.maharashtra.gov.in) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सदर विभागातील पदवीधर मतदार यादीत नोंदणीसाठी अर्ज सादर करण्यासाठी संबंधित अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावा लागेल.यासाठी फॉर्म क्रमांक १८ उपलब्ध असून,मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयात तसेच संबंधित तहसील कार्यालयात ते उपलब्ध आहेत.अधिक माहितीसाठी अर्ज डाउनलोड करण्यासाठी संकेतस्थळः https://ceoelection.maharashtra.gov.in/Downloads/DownloadForms/Form-18.pdf यावरून डाउनलोड करावे.असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी,धाराशिव यांनी कळविले आहे.