धाराशिव (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी असलेल्या तुळजापूर मंदिर परिसरात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,धाराशिव यांच्या मार्फत बाल भिक्षेकरी पुनर्वसन रेस्क्यू मोहीम राबविण्यात आली.ही मोहीम दोन सत्रांमध्ये पार पडली.सकाळच्या सत्रात ३ तर दुपारच्या सत्रात ४ अशी एकूण ७ बालकांची सुटका करून त्यांना बाल कल्याण समिती,धाराशिव यांच्याकडे सादर करण्यात आले.
मोहिमेचे मार्गदर्शन प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे यांनी केले.यावेळी जिल्हा संरक्षण अधिकारी श्री.भुजंग भोसले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री. अमोल कोवे,जिल्हा समन्वयक (चाईल्ड हेल्पलाईन) श्री.विकास चव्हाण,वन स्टॉप सेंटर समन्वयक प्रियंका जाधव यांच्यासह बाल संरक्षण कक्षातील अधिकारी- कर्मचारी,चाईल्ड हेल्पलाईन कर्मचारी,वन स्टॉप सेंटर कर्मचारी, पोलिस विभाग,मंदिर सुरक्षा रक्षक तसेच युवा ग्राम विकास मंडळाचे प्रकल्प समन्वयक श्री.संतोष रेपे आदी उपस्थित होते.या मोहिमेमुळे बाल भिक्षेकरी पुनर्वसनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.