तुळजापू (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले यांनी सकाळी श्री तुळजाभवानी देवींचं दर्शन घेतले.

या वेळी कल्पनाराजे भोसले यांनी देवीची ओटी भरत कुलधर्म, कुलाचार केले तसेच आरती करून देवीचे आशीर्वाद घेतले. मंदिर संस्थानच्या वतीने कल्पनाराजे भोसले यांचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा व महावस्त्र भेट देत यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे, सहायक जनसंपर्क अधिकारी अभिजित तेरखेडकर, सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पराडे, श्रीकांत पवार, नवनाथ खिंडकर, सहायक स्वच्छता निरीक्षक अक्षय साळुंके व मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.


 
Top