कळंब (प्रतिनिधी)- सहकार क्षेत्रातील नामांकित बँक असलेल्या प्रियदर्शनी अर्बन को-ऑप. बँक लि.कळंब ची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे चेअरमन श्रीधर भवर यांच्या अध्यक्षतेखाली दि . 7 रोजी हॉटेल संतूर च्या कॉन्फरन्स हॉल येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. 2024-2025 या सहकार वर्षात बँकेने उत्तुंग भरारी घेत 31 मार्च 2025 अखेर बँकेतील एकूण ठेवी 104 कोटी 35 लाख तर कर्ज वाटप 61 कोटी 94 लाख झाले आहे. बँकेचे एकूण खेळते भागभांडवल 4 कोटी 63 लाख आहे. बँकेने 2024-2025 या आर्थिक वर्षात एकूण व्यवसाय हा 166 कोटी 29 लाख झालेला आहे. बँकेला या वर्षात ढोबळ नफा 1 कोटी 46 लाख झालेला आहे. बँकेने नक्त हा 0% (शून्य टक्के) सातत्याने राखलेला आहे. तसेच बँकेस भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून मंजूर करण्यात आलेल्या नवीन दोन शाखा केज जि.बीड आणि शिराढोण जि.धाराशिव या ग्राहकांच्या सेवेत लवकरच चालू करत आहोत. तसेच बँकेच्या सभासदांना 5 टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर बँकेचे संचालक नानासाहेब इखे, विजयानंद तांबारे, भागवत सुरवसे, विलास आडणे, डॉ.ऋषिकेश भवर, डॉ. साजेद चाऊस, विक्रम गायकवाड संचालिका सौ.सुप्रिया सोनटक्के, सौ.पुष्पा पवार तज्ञसंचालक योगीराज लांडगे , बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रदीप शिंदे, सरव्यवस्थापक आशिष हेड्डा उपस्थित होते.
वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रास्ताविक संचालक नानासाहेब इखे यांनी केले. अहवाल वाचन बँकेचे चेअरमन श्रीधर भवर यांनी केले. जेष्ठ सभासद डॉ.रामकृष्ण लोंढे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सभेचे सूत्रसंचालन संतोष गायकवाड यांनी तर संचालक डॉ.साजेद चाऊस यांनी आभार प्रदर्शन केले. सभेस सर्व सभासद, कर्मचारी,पिग्मी कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
