तुळजापूर (प्रतिनिधी)- अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष तसेच भाभा अणुसंशोधन केंद्राचे माजी संचालक अजित कुमार मोहंती यांनी सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला.
मोहंती कुटुंबीयांनी देवीची ओटी भरून कुलधर्म व कुलाचार पार पाडले. त्यानंतर देवींची आरती करत मोहंती कुटुंबीयांनी मनोभावे देवींचे दर्शन घेतले. दर्शनानंतर मंदिर संस्थानच्या वतीने श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा व महावस्त्र भेट देऊन अजित कुमार मोहंती यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक अर्जून चौधर, जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे, सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम, सहायक सुरक्षा निरीक्षक दीपक शेळके तसेच मंदिर संस्थानचे अन्य कर्मचारी उपस्थित होते. ओडिशा येथील मूळ रहिवासी असलेले अजित कुमार मोहंती हे देशातील अणुऊर्जा क्षेत्रातील नामवंत वैज्ञानिक असून त्यांनी भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले आहे.
