तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञोत्सवातील सहाव्या माळेदिनी शनिवार दि. 27 सप्टेंबर रोजी देविजींचा सिंहासनावर मुरली अलंकार महापुजा मांडण्यात आली होती. 

या पुजे बाबतीत अशी आख्यायिका सांगितली  जाते कि, भगवान श्रीकृष्ण यानी जगदंबा मातेस आपली मुरली (बासरी) दिली. त्या प्रसंगाची आठवण म्हणून सहाव्या माळेदिनी तुळजाभवानी मातेच्या मुख्य सिंहासनावर मुरली अलंकार पुजा“ मांडण्यात आली. श्री तुळजाभवानी देवीजींचे हे रुप अत्यंत मनमोहक आहे. शुक्रवार राञी श्रीतुळजाभवानी मंदीर प्रांगणात श्री तुळजाभवानी देवीजींची छबिना मिरवणूक वाघ वाहनांवरुन काढण्यात आली.

 
Top