तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव 2025 अंतर्गत तुळजाभवानी सैनिक विद्यालय, तुळजापूर येथे दिनांक 29 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला ड्रोन शो प्रतिकूल हवामानामुळे पुढे ढकलण्यात आला आहे.
मंदिर संस्थानच्या वतीने कळविण्यात आले की, भक्तांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे हा शो आता योग्य व शुभ प्रसंगी आयोजित करण्यात येईल. नविन दिनांक लवकरच जाहीर केला जाईल.अशी माहीती मंदीर प्रशाषणाने दिली.