तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील धाराशिव रस्त्यावर असणाऱ्या अशोक हाँटेल समोर लावलेल्या वाहनाची काच अज्ञाताने फोडुन आतील रोख रकमेसह 5,24,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेल्याची रविवार दि. 28 सप्टेंबर रोजी राञी सात वाजता घडली.
या बाबतीत अधिक माहीती अशी कि, कविता देवी पर्णचंद्राराव गंटा, वय 48 वर्षे, व्यवसाय सिनियर सिव्हील जज, जहीराबाद ता. जहीराबाद जि.संघारेड्डी तेलंगाना या रविवार दि.27 सप्टेंबर रोजी हॉटेल अशोक येथे जेवन करत होत्या. त्यावेळी हॉटेल बाहेर लावलेली महिंद्र एक्स यु व्ही 700 गाडी क्र. टी. एस. 28 एल 6666 हिचा काच अज्ञात व्यक्तीने फोडून गाडीतील ईटकरी बॅग व एक काळ्या रंगाची हँड बॅग मधील 120 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, रोख रक्कम 35 हजार रूपये व नविन कपडे असा एकुण 5 लाख 24 हजार रूपये किंमतीचा माल चोरुन नेला. अशी फिर्यादी कविता देवी गंटा यांनी दि.28 सप्टेंबर रोजी दिल्यावरून तुळजापूर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.