धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यात अप्रत्यक्ष भाजप पक्षाला धक्का बसला आहे.भाजपमध्ये गेलेल्या सुनील चव्हाण यांच्या बरोबर न जाता असंख्य कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबई मातोश्री येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसचे युवक नेते ऋषिकेश मगर यांच्या नेतृत्वाखाली ही मंडळी एकत्र येत चव्हाण विरोधात बंड पुकारल. 

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र तथा जिल्हा बँकेचे संचालक सुनिल चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा काँग्रेस मधील मोठा गट अस्वस्थ होता. या गटाला भाजप मध्ये आणण्यासाठी भाजपकडून अनेक प्रयत्न झाले. पण भाजप बरोबर जायचं नाही व त्याला सक्षमपणे विरोध करणाऱ्या पक्षात काम करण्यावर या गटाचे एकमत झालं. भाजपला आव्हान देण्याची क्षमता फक्त शिवसेना ठाकरे पक्षातच असल्यामुळे त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मंगळवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर शिवबंधन बांधलं. तालुक्यातील अनेक सरपंच,बाजार समिती संचालक यांनी ठाकरे सेनेत यांनी प्रवेश केला.युवक नेते ऋषिकेश मगर यांनी या गटातील नाराज नेते, कार्यकत्यांची मोट बांधली. 

यामध्ये प्रामुख्याने काटीचे सरपंच सुजित हंगरकर, वडगाव काटीचे सरपंच गौरीशंकर कोडगिरे,उद्योजक मोहन जाधव,वाडीबामणीचे उपसरपंच अमर माने,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामचंद्र ढवळे, कोरेवाडीचे सरपंच श्री.कोकरे, वडगाव लाखचे सरपंच बालाजी चंदनशिवे,माजी सरपंच दिलीप सावंत. शहाजी देवगुंडे, काक्रंबाचे माजी सरपंच प्रभाकर घोगरे. माजी सरपंच श्री.मदने, सावरगावचे ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब काडगावकर,जळकोटचे उपसरपंच प्रशांत नवगिरे, स्वप्निल शिंदे, उपसरपंच मनोज गायकवाड. सौदागर जाधव, रोहित गवळी,संजय पारवे, दिलीप सावंत, समाधान माने,राजाभाऊ नळेगावकर, शहाजी देवगुंडे,प्रभाकर घोगरे,सिद्धनाथ मदने,सुरेश कोकरे, बालाजी चंदनशिवे, रामचंद्र चंदनशिवे, शत्रुघ्न देवकर, संतोष जटाळ या प्रमुख पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. पदाधिकाऱ्यांची उपस्थिती धाराशिव जिल्हा शिवसेना समन्वयक श्याम पवार .धाराशिव जिल्हा शिवसेना संघटक राजअहमद पठाण. जितेंद्र कानडे शिवसेना उपजिल्हाप्रमुख, जगन्नाथ गवळी, शहर प्रमुख राहुल खपले, बाळकृष्ण पाटील, माजी शहर प्रमुख सुधीर कदम. शिवसेना शहर संघटक अर्जुन साळुंखे, चेअरमन सुनील जाधव, चेतन बडगर,बालाजी पांचाळ, कृष्णात मोरे,अनिल छत्रे, नवनाथ जगताप, यांच्यासह तुळजापूर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


निम्न तेरणाचे लढवय्ये शिवसेनेत :

धाराशिव येथील निम्न तेरणा संघर्ष समितीचे प्रमुख जगदीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोविंद गरड, विक्रम भोसले,बाळासाहेब पाटील,निखिल वाघमारे यांनी प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी मुकेश पाटील, खंडू शिंदे,दत्ता चव्हाण,नेताजी गायकवाड, अश्विन पाटील, सुभाष कळसुले, बालाजी सगट, मुकेश पाटील, महादेव ढोले, चंदू ताकमोगे,सुधीर गायकवाड, पल्लव पाटील, निखिल वाघमारे,धनराज कुंभार, जैनुद्दीन सय्यद आदि पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top