तुळजापूर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवाचे दिवस सुरू असताना लाखो भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरात दाखल होत आहेत. मात्रयेथील  दीपक चौक येथील हनुमान मंदिर परिसर भाविकांसाठी संकटाचे केंद्रबिंदू ठरत असल्याचे निवेदन मनोझा गवळी यांनी दिले आहे. 

याविषयी नगर परिषदेला दिलेल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे की, हा भाविकांचा सर्वाधीक वर्दळीचा रस्ता असून या दिपक चौकातील रस्त्यावरून दैनंदिन लाखो भाविक घाटशीळ परिसरात असलेल्या दर्शन मंडपात जातात. येथील  हनुमान मंदिराभोवतालच्या व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले असून त्यामुळे भाविकांच्या हालचालीत अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने दर्शन मंडपांची व्यवस्था केली असली तरी अतिक्रमणामुळे गर्दीतून जाणाऱ्या भाविकांना जीव मुठीत धरून जावं लागत आहे.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूरात दररोज लाखो भाविकांची गर्दी होत असताना मंदिर परिसरात अतिक्रमणाचा प्रश्न उग्र बनला आहे. यामुळे प्रशासनाची तातडीची कारवाई अपेक्षित आहे, अन्यथा भाविकांच्या सुरक्षेला मोठा धोका संभवतोय. “चौकाच्या मध्यभागी झालेलं अतिक्रमण कधीही अपघात घडवून आणू शकतं. जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही. भाविकांच्या सुरक्षेसाठी तातडीने अतिक्रमण हटवणं गरजेचं आहे.”


 
Top