तुळजापूर (प्रतिनिधी)-   तालुक्यातील माताभगिनींनी “उपासमार नको, आरक्षणाची लढाई मोठी आहे” या भावनेतून आपल्या लेकरांसाठी चुली पेटवल्या आहेत. आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी धडाडीने लढणाऱ्या बांधवांना अन्न-पाण्याची कमतरता जाणवत असल्याचे वृत्त कळताच तालुक्यातील गावोगावच्या महिला एकदिलाने पुढे सरसावल्या.

आझाद मैदानावर उपाशीपोटी लढणाऱ्या मराठा बांधवांना गावोगावच्या आई माऊलीं घरच्या मायेचा घास पाठवुन देत आहेत. मंगरुळ  येथुन 1100 ब्लँकेट व भोजन तसेच मसला खुर्द सारख्या छोट्या गावातूनच 10 हजार भाकऱ्या, 2 हजार चपात्या, ठेसा, चटणी, लोणचे, कांदा, ओल्या भुईमुंग शेंगा, हजारो फरसाण पाकिटे, पाणी बाटल्या मुंबईकडे रवाना केल्या. संध्याकाळी सहाला भाकरी  करण्यास आरंभ नऊ वाजता ही शिदोरी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनात. तर सकाळी आंदोलकांचा घशात ही मायेची भाकरी जात आहे. आरक्षणसाठी लढणा-या समाज बांधव यांची “उपासमार नको, लढाई शेवटपर्यंत लढण्यासाठी शिदोरी पोहचवायाचे असा निर्धार ग्रामीण भगिनींनी केला आहे. ही फक्त रसद नाही, तर आईच्या हातचा मायेचा घास आंदोलनाच्या जोशाला नवं बळ देत आहे.

मसला, मसला खुर्द, लहानशा गावातून हजारो भाकऱ्या, हजारो चपात्या, फरसाण पाकिटे, ठेसा-चटणी, लोणची, कांदे, शेंगा, पिण्याचे पाणी व ग्रामीण रसद मुंबईकडे रवाना झाली आहे. संध्याकाळी जेवण करून घरकाम आटोपल्यावर मायमाऊली स्वतःच्या हाताने भाकरी थापून, चटणी-लोणचे बांधून सकाळी नऊ वाजताच आयशर ट्रक व अन्य वाहनांतून मुंबई गाठत आहेत.“घरची मायेची भाजीभाकरी आंदोलकांच्या ताटात जावी, तेवढीच आमच्यासाठी पुण्याई”, असे सांगत ग्रामीण भगिनी या अन्नसेवेतून आपली माया आणि एकजूट दाखवत आहेत. लहान गावातील स्त्रियांनी केलेल्या या हटके अन्नसेवेने मराठा आंदोलनाला फक्त रसदच नव्हे, तर आईच्या हातचा मायेचा स्पर्श दिला आहे. ही खरी गावकुसातून उगवलेली अन्नसेवा ताकद आंदोलनाला इंधन देणारी ठरत आहे.

 
Top