भूम (प्रतिनिधी)- प्रवाशी दैवत समजून कर्तव्य निभावल तर निश्चितपणे महामडळाला फायदा होतो अन प्रवाशाच समाधान होतं . हिच सदभावना समोर ठेवून सेवा केली म्हणून सेवानिवृत्ती कार्यक्रमाला मोठा जनसमुदाय उपस्थित असल्याच समाधान आगार प्रमुख उल्हास शिनगारे यांनी वाहक सोमनाथ बागडे यांच्या सेवानिवृत्ती निरोप प्रसंगी व्यक्त केलं 

रविवार दि. 31 ऑगष्ठ 2025 रोजी भूम आगाराचे वाहक सोमनाथ दत्तात्रय बागडे यांना नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांना  निरोप देण्यात आला . यावेळी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक अभिजीत कवडे, वाहतूक निरीक्षक जी.एस. गायकवाड, वाहतूक नियंत्रक सुभाष ठाणांबीर, कामगार संघटना अध्यक्ष महेश शिंदे, सचिव नामदेव नागरगोजे, कोष्टी समाज ट्रस्ट अध्यक्ष विठ्ठल बागडे, सचिव पत्रकार शंकर खामकर, उद्योजक प्रसाद बागडे, तेरणा महाविद्यालयाचे डिन डॉ. दिगंबर दाते, श्रीमंत श्री चौंडेश्वरी तरुण गणेश मंडळाचे अध्यक्ष दत्ता वैद्य, राजाभाऊ लोंढे, सुरेश खामकरसह उद्योग, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील अनेकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.


 
Top