नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्गहून होर्टी, किलज, चिकुंद्रा आणि लोहारा जाणाऱ्या रस्त्यावरील नळदुर्ग नजीकचा बोरी नदीवरील पूल गेल्या दोन दिवसापासून पाण्याखाली गेल्याने वाहतुकीस बंद आहे. यामुळे या गावच्या लोकांना दुसऱ्या मार्गाने जावे लागत आहे. 

बोरीधनाच्या पाणलोट क्षेत्रात सतत होत असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात बोरी धरणाचा सांडवा वाहत आहे.  या सांडव्यातून येणारे पाणी बोरी नदीच्या पात्रातून जात आहे. दरम्यान नळदुर्ग ते होर्टी, चिकुंद्रा, किलज, लोहारा जाणाऱ्या रस्त्यावरील नळदुर्ग जवळ असलेल्या बोरी नदीच्या पुलावरून पाणी जात असल्याने हा मार्ग सध्या वाहतुकीसाठी बंद आहे. नळदुर्ग येथील राष्ट्रीय महामार्ग चा बाह्य वळण रस्ता हा मैलरपुर परिसरातून गेला आहे आणि याच बाह्य वळण रस्त्यावर बोरी नदीवर उड्डाण पूल बांधण्यात आला आहे. त्या पुलाच्या खाली बोरी नदीच्या पात्रात उड्डाण पुलाचे गर्डेल टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात खडक भरून भराव घातला होता. त्यामुळे तो भराव संबंधित विभागाने किंवा ठेकेदाराने काढला नसल्यामुळे बोरी नदीच्या पात्रातील पाण्याचा तुंब वाढला असल्याने नळदुर्ग, होर्टी रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला आहे.

 
Top