धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील श्री. तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव यात्रा ही दि.22.09.2025 ते 02.10.2025 साजरी होणार आहे. यानिमित्त श्री. तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवासाठी लाखो भाविकांची गर्दी होत असते. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा अपघात होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये, या करीता विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, छत्रपती संभाजीनगर यांनी श्री. तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव याठिकाणी दि.26 सप्टेंबर रोजी भेट देवून मंदीर परीसर, यात्रा परिसर, पाहणी करुन यात्रा बंदोबस्त कामी नेमण्यात आलेले पोलीस अधिकारी, पोलीस अमंलदार, होमागार्ड यांना योग्य त्या सुचना देवून मार्गदर्शन केले.
तसेच बंदोबस्त कामी हजर असणारे पोलीस अंमलदार यांना रेनकोट वाटप केले. सांस्कृतिक कार्यक्रम सैनिक स्कुल मैदान तुळजापूर येथे भेट दिली. सदर वेळी पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख, तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोनि मांजरे, बंदोबस्तावरील अधिकारी अंमलदार हजर होते.